मुंबईतील ‘हे’ फाईव्ह स्टार हॉटेल बंद, पगार देण्यासाठीही उरले नाहीत पैसे, कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका

मुंबईतील सुप्रसिद्ध हयात रिजेंसी हे हॉटेलमध्ये सातत्याने श्रीमंतांची वर्दळ असायची. देशविदेशातील पर्यटक, गर्भश्रीमंत नागरिकांचा वेगवेगळ्या कारणांसाठी या हॉटेलमध्ये सतत वावर असायचा. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या हॉटेलकडे कुणीच फिरकत नसल्याचं चित्र आहे. याचा परिणाम हॉटेलच्या आर्थिक गणितावर झालाय. 

    कोरोनाचा फटका जगभरातील अर्थव्यवस्थांना बसला.अनेकांचे व्यवसाय बुडाले, कंपन्या बंद पडल्या, सामान्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि कोट्यवधी नागरिक देशोधडीला लागले. देशातील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायावर गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या लॉकडाऊनचा विपरित परिणाम झाला. त्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध हयात रिजेंसी हॉटेलने आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय.

    मुंबईतील सुप्रसिद्ध हयात रिजेंसी हे हॉटेलमध्ये सातत्याने श्रीमंतांची वर्दळ असायची. देशविदेशातील पर्यटक, गर्भश्रीमंत नागरिकांचा वेगवेगळ्या कारणांसाठी या हॉटेलमध्ये सतत वावर असायचा. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या हॉटेलकडे कुणीच फिरकत नसल्याचं चित्र आहे. याचा परिणाम हॉटेलच्या आर्थिक गणितावर झालाय.

    सध्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीदेखील पैसे नसल्याचं कारण सांगत या हॉटेलने पुढील आदेश येईपर्यंत शटर डाऊन करण्याचा निर्णय घेतलाय. हॉटेलचे जनरल मॅनेजर हरदीप मारवा यांनी माध्यमांना ही माहिती दिलीय. यातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून शक्य तितक्या लवकर हॉटेल पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    हॉटेलमधील गेस्ट हीच आमची प्राथमिकता असून लवकरात लवकर निधी उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मारवांनी दिलीय. हॉटेलच्या मालकांसोबत चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघेल, अशी आशा सर्व कर्मचारी बाळगून असल्याचंही त्यांनी सांगितलं.