धुके, धुरकटलेली हवा यामुळं मुंबईतील हवेतील गुणवत्तेत मोठी घसरण, दमा, आणि श्वसनासंबंधित आजारात वाढ

रविवारी कुलाबा, चेंबुर आणि अंधेरी येथील AQI देखील अत्यंत खराब श्रेणीत होता. त्यामुळे ही परिस्थिती कामगार वर्गासाठी खूप हानीकारक असल्याचे म्हटले जातेय. कारण यामुळे श्वसनासंबंधित आजार बळावत आहेत. 24 – 25 जानेवारी रोजी मुंबई शहरातील हवेचा AQI ने 500 चा आकडा ओलांडल्यानंतर अनेक मुंबईकरांना दमा, घसा, छाती आणि इतर श्वसनासंबंधित वाढू लागले आहे.

    मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून वातावरणातील हवेच्या गुणवत्तेत कमालीची घसरण झाली असून, परिणामी श्वसनाचे आजारात वाढ झाली आहे. रविवारी कुलाबा, चेंबुर आणि अंधेरी येथील AQI देखील अत्यंत खराब श्रेणीत होता. त्यामुळे ही परिस्थिती कामगार वर्गासाठी खूप हानीकारक असल्याचे म्हटले जातेय. कारण यामुळे श्वसनासंबंधित आजार बळावत आहेत. 24 – 25 जानेवारी रोजी मुंबई शहरातील हवेचा AQI ने 500 चा आकडा ओलांडल्यानंतर अनेक मुंबईकरांना दमा, घसा, छाती आणि इतर श्वसनासंबंधित वाढू लागले आहे. हवेतील गुणवत्ते घसरण झाल्याने हि हवा मुंबईकरांच्या आरोग्यास हानीकारक असल्याचे बोलले जात आहे.

    दरम्यान, मुंबईत गुलाबी थंडीच्या वेळी हवेत दमटपणा, तसेच धुर, धुक्यानी हवेच्या गुणवत्तेत घट झाली आहे. मुंबईत 25 जानेवारीची प्रदुषणाची पातळी ही एक विक्रमी असल्याचे म्हटले आहे. कारण मुंबईत याआधी कधीही 500 च्या पुढे AQI नोंदवले गेले नव्हते. दिल्ली पाठोपाठ मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. यात 26 जानेवारीपासून धुक्यांचे वादळ कमी झाले. तर दीर्घकाळपर्यंत असलेले अल्हाददायक वातावरणही कमी होत आहे. त्यामुळे रविवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता खूप खराब नोंदवली गेली. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 316 च्या आसपास होता. तर दिल्लीचा AQI (320) इतका होता. चिंताजनक बाब म्हणजे माझगाव येथील हवेची गुववत्ता (AQI) दिल्लीपेक्षा वाईट म्हणजे 426 वर होता. त्यामुळे मुंबईत दमाचे, श्वसनाचे आजार वाढल्याचे दिसून येत आहे.

    मुंबईच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात समुद्र लाभला आहे. समुद्र किनारे असल्याने प्रदुषण जलद गतीने पसरण्यात मदत होते. मात्र हे समुद्री वारे नसले तर मुंबईचा AQI हा नियमितपणे दिल्लीपेक्षा अत्यंत वाईट स्थितीत असता असे तज्ञांचे मत आहे. हवेतील गुणवत्तेतील घट झाल्याने आरोग्यास हानीकारण असल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.