budget presentation by ajit pawar

अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. या (Maharashtra Budget 2022-23) अर्थसंकल्पामध्ये (Provision In Budget For Memorials And Tourism)  स्मारके, शाळा, महाविद्यालये, तीर्थक्षेत्रे, किल्ले आणि पर्यावरण विषयक योजनांसाठी खास तरतूद करण्यात आली आहे.

  मुंबई : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) आज सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये (Provision In Budget For Memorials And Tourism)  स्मारके, शाळा, महाविद्यालये, तीर्थक्षेत्रे, किल्ले आणि पर्यावरण विषयक योजनांसाठी खास तरतूद करण्यात आली आहे. कोणत्या गोष्टीसाठी किती तरतूद करण्यात आली आहे त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

  •  “भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय” स्थापित करण्यासाठी १०० कोटी रूपये निधी राखीव
  • स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमीत्त वढु बुद्रुक व तुळापूर, ता.हवेली जि.पुणे या परिसरात स्मारकासाठी २५० कोटी रुपये निधी उपलब्ध करणार.
  • छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना” सुरु करणार.
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरूषांशी संबंधित गावांतील १० शाळांकरिता १० कोटी रुपये निधी
  • मुंबई, पुणे व नागपूर येथे स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत स्थळांचा ‘हेरिटेज वॉक’
  • रायगड किल्ला व परिसर विकासाकरीता १०० कोटी, राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी, मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी ७ कोटी प्रस्तावित.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव दाखल करण्याकरीता नियतव्यय प्रस्तावित.
  • “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत ५०० कोटींची तरतूद,स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मासिक उत्पन्नाची १० हजार रुपयांची मर्यादा ३० हजार रुपये
  • औरंगाबाद येथील अमृत महोत्सवी वंदे मातरम सभागृहांकरीता ४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • अष्टविनायक विकास आराखड्याकरीता ५० कोटी रुपये
  • पंढरपूर देवस्थान मंदिर विकासासाठी ७३ कोटी ८० लाख रूपये रकमेचा आराखडा
  • मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी ७५ कोटी रुपये.

  स्मारक

  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक उभारणार, महाराणी सईबाई स्मृतीस्थान विकास आणि श्री संत जगनाडे महाराज स्मारकांसाठी निधी उपलब्ध करुन देणार.
  • पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागातील ५ लाख घरकुल बांधकामाकरीता ६००० कोटी रूपये उपलब्ध करुन देणार
  • मुंबईबाहेरील झोपडपट्टयांमधील सुधारणा मुलभूत कामे करण्यासाठी १०० कोटी रूपये उपलब्ध करुन देणार.

  पर्यटन

  •  कोयना,जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित
  • जव्हार जि.पालघर, फर्दापूर जि.औरंगाबाद, अजिंठा,वेरूळ,महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरीता सुव‍िधा निर्माण करण्यासाठी अनुदान.
  • पुरातत्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय “महावारसा सोसायटीची स्थापना.
  • बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात ‘आफ्रिकन सफारी’ सुरु करणार.
  • पुणे वन विभागात बिबट्या सफारी सुरु करणार.