chagan bhujbal

पाच जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जाहीर झालेल्या पोटनिवडणूका पुढे ढकला किंवा तो निर्णय थांबवा अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.  या पोटनिवडणुकीतील जागा या खुल्या प्रवर्गातून नियुक्त होणार आहेत. त्याला छगन भुजबळ यानी विरोध दर्शवला आहे.

    मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर पाच जिल्ह्यांत पोटनिवडणूका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत देशात एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींवर निर्बंध आणण्यात आले. पण निवडणूक आयोगाने मात्र पोटनिवडणूका जाहीर केल्या आहेत.

    पाच जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जाहीर झालेल्या पोटनिवडणूका पुढे ढकला किंवा तो निर्णय थांबवा अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.  या पोटनिवडणुकीतील जागा या खुल्या प्रवर्गातून नियुक्त होणार आहेत. त्याला छगन भुजबळ यानी विरोध दर्शवला आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडण्याबाबत त्यानी मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे सांगितले.