आशिया कपसाठी फुटबॉल क्रीडांगण तयार, तयारीचा आयुक्तांनी घेतला आढावा

जगभरातून येणाऱ्या खेळाडूंची कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यादृष्टीने आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या. शॉवर सुविधेसह ड्रेसींग रूम, रेस्ट रुम, वेटींग लाँज, स्टोअर रुम अशा आवश्यक सुविधांची तसेच पुरेशा प्रमाणात फ्लड लाईट्सची सर्व अनुषांगिक सुविधांसह व्यवस्था करण्यात आलेली आहे. जगभरातून येणा-या या महिला खेळाडूंची निवास व्यवस्था ज्या भागामध्ये कऱण्यात आलेली आहे त्याठिकाणच्या सुविधांवरही आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन यांच्याशी संपर्कात राहून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यावरही काटेकोर लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

  सिद्धेश प्रधान नवी मुंबई – 17 वर्षाखालील महिला अशियाई फुटबॉल करंडक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत होणार होत आहे. या स्पर्धेच्या शुभारंभाचा सामना तसेच अंतिम सामना नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये कोव्हीडच्या सर्व नियमांचे कोटेकोर पालन करून खेळविला जाणार आहे. या जागतिक स्तरावरील स्पर्धेचे यजमानपद नवी मुंबई शहराला लाभलेले आहे. स्पर्धेचे सराव सामने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 19 नेरुळ येथील डॉ. यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदानामध्ये होणार आहेत. त्यानिमित्ताने आयुक्तांनी या मैदानाच्या तयारीची पाहणी केली.

  जगभरातून येणाऱ्या खेळाडूंची कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यादृष्टीने आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या. शॉवर सुविधेसह ड्रेसींग रूम, रेस्ट रुम, वेटींग लाँज, स्टोअर रुम अशा आवश्यक सुविधांची तसेच पुरेशा प्रमाणात फ्लड लाईट्सची सर्व अनुषांगिक सुविधांसह व्यवस्था करण्यात आलेली आहे. जगभरातून येणा-या या महिला खेळाडूंची निवास व्यवस्था ज्या भागामध्ये कऱण्यात आलेली आहे त्याठिकाणच्या सुविधांवरही आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन यांच्याशी संपर्कात राहून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यावरही काटेकोर लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

  फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असून महानगरपालिका शाळांमधूनही फुटबॉलचे प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन खेळाडू घडवावेत असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी सांघिंक खेळांमधून व्यक्तीचा विकास होतो हे स्पष्ट करीत फुटबॉल, हॉकी प्रमाणेच खो-खो, कबड्डी अशा देशी खेळांनाही प्रोत्साहित करण्याची भूमिका मांडली. यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिका यादृष्टीने नियोजनबध्द काम करेल.

  अभिजीत बांगर (आयुक्त, नवी मुंबई महापालिका)

  शहरातील खेळाडूंना मिळणार क्रीडांगण

  नवी मुंबई महानगरपालिकेने फिफा आणि आशियाई करंडक स्पर्धेच्या निमित्ताने विकसित केलेले हे फुटबॉल क्रीडांगण या स्पर्धा झाल्यानंतर शहरातील फुटबॉल खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  त्यांच्यामधून दर्जेदार व्यावसायिक संघ निर्माण करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे असे आयुक्तांनी क्रीडा विभागास निर्देशित केले.

  नवी मुंबई पालिकेचे सेक्टर 19 नेरुळ येथे सन 2017 मधील फिफा स्पर्धेकरिता विकसित करण्यात आलेले यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. त्यावेळी त्याठिकाणी सराव केलेल्या न्यूझिलंड, इंग्लड, स्पेन, ब्राझिल, बाली, टर्की अशा नामांकीत संघातील खेळाडूंनी केली होती.