
दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रातून माजी खासदार रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. १५ सप्टेंबर पासून नामांकन दाखल करण्याची तारीख गेल्यानंतर पाच दिवस झाले तरी कॊंग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत तर्क केले जात होते मात्र आता रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मुंबई : दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रातून माजी खासदार रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. १५ सप्टेंबर पासून नामांकन दाखल करण्याची तारीख गेल्यानंतर पाच दिवस झाले तरी कॊंग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत तर्क केले जात होते मात्र आता रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्या नामांकनअर्ज दाखल करतील अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे.
या जागेसाठी काँग्रेस नेते मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांच्यासह दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र रजनी पाटील यांनी मागील वेळी राज्यसभा नाकारल्याने त्यांचे नांव राज्यपाल नियुक्त यादीत आग्रहपूर्वक समाविष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाच्या यादीला उशीर झाल्याने रजनी पाटील यांचा फायदा झाला असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यांना ही निवडणुक जिंकण्यात यश आले तर त्यांच्या राज्यपाल नियुक्त जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे असे सांगण्यात येत आहे. भाजपने या जागेसाठी संजीव उपाध्याय या उत्तर भारतीय नेत्याला संधी दिली आहे.