प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

भांडुप येथील मुंबई महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील नवजात शिशूसाठी असलेल्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे संसर्ग होऊन 'सेफ्टीक शॉक'मुळे चार लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २ बालके व्हेंटिलेटरवर आहेत, असा गंभीर व खळबळजनक आरोप भाजपाचे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे(Four babies died due to 'septic shock' at Savitribai Phule Maternity Hospital in Bhandup; BJP's serious allegations). दरम्यान भाजपच्या नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनासमोर संताप व्यक्त करत तीव्र निदर्शने केली.

  मुंबई : भांडुप येथील मुंबई महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील नवजात शिशूसाठी असलेल्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे संसर्ग होऊन ‘सेफ्टीक शॉक’मुळे चार लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २ बालके व्हेंटिलेटरवर आहेत, असा गंभीर व खळबळजनक आरोप भाजपाचे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे(Four babies died due to ‘septic shock’ at Savitribai Phule Maternity Hospital in Bhandup; BJP’s serious allegations). दरम्यान भाजपच्या नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनासमोर संताप व्यक्त करत तीव्र निदर्शने केली.

  प्रसूतीगृहातील अतिदक्षता विभाग हा एका खासगी वैद्यकीय संस्थमार्फत चालविण्यात येत असून या संस्थेच्या व त्यांच्या डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे १८ डिसेंबर रोजी शॉर्टसर्किट झाला आणि संसर्ग होऊन ‘सेफ्टीक शॉक’मुळे अनुक्रमे २०,२१ आणि २२ डिसेंबर रोजी ४ लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, असा आरोपही भाजपतर्फे करण्यात आला.

  अतिदक्षता विभाग चालविणाऱ्या वैद्यकीय संस्थेकडून पालिकेने प्रसूतिगृहाची जबाबदारी काढून घ्यावी. तसेच, या संस्थेच्या विरोधात आणि संबंधित डॉक्टर, कर्मचारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या गंभीर घटनेला जबाबदार खासगी वैद्यकीय संस्थेचा परवाना रद्द करावा,अशी जोरदार मागणी भाजपच्या संतप्त नगरसेवकांनी केली आहे.

  यावेळी, भाजपच्या नगरसेवकांनी हातात फलक घेऊन व उत्स्फूर्त घोषणा देत पालिका मुख्यालयातील महापौर दालनासमोर पालिका आरोग्य विभाग, सत्ताधारी शिवसेना व घटनेला जबाबदार खासगी वैद्यकीय संस्थेचा जाहीर निषेध केला. भाजपने महापौर दालनासमोर घोषणाबाजी, निदर्शने केल्याने पालिकेतील वातावरण तापले होते.

  भांडुप येथील प्रसूतिगृहात गेल्या ४ दिवसांत ४ लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन व संबंधित डॉक्टर, कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळेच ४ बालकांचा नाहक बळी गेला आहे. महापौर, सत्ताधारी हे राणी बागेतील ‘ पेंग्विन’वर कोट्यवधी रुपये खर्चून त्यांची जीवापाड काळजी घेतात मात्र रुग्णालये, प्रसूतिगृह येथील लहान बालकांच्या जीवाची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत.

  यापूर्वी, नायर रुग्णालयातही एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भाजपच्या आरोग्य समितीवरील सदस्यांनी त्यावेळी पालिका प्रशासन व सत्ताधारी यांचा निषेध व्यक्त करत राजीनामे दिले होते. आता पुन्हा भांडुप येथे दुर्दैवी घटना घडली आहे, अशी माहिती देताना भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.