मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळ कारचा अपघात, चार जण ठार

क्रॉफर्ड मार्केट परिसरात रात्री ९ वाजता एका भरधाव कारने ८ जणांना धडक दिली. या अपघातात ३ महिला आणि एका पुरुषाचा अपघातात मृत्यू झाला असून इतर ४ जणांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळ पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव कारने ८ जणांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना क्रॉफर्ड मार्केट जवळील जनता हॉटेलच्या परिसरात रात्रीच्या घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तसेच या प्रकरणाची चाचपणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रॉफर्ड मार्केट परिसरात रात्री ९ वाजता एका भरधाव कारने ८ जणांना धडक दिली. या अपघातात ३ महिला आणि एका पुरुषाचा अपघातात मृत्यू झाला असून इतर ४ जणांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, घटनास्थळावरुन कारचा चालक फरार झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.