From January 1, it will be more expensive to order food from Zomato, Swiggy in Mumbai; Delivery charges will increase

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून ऑनलाईन ऑर्डर करणे आता महाग पडणार आहे. झोमॅटो, स्विगीवरून जेवण मागवणे महागणार आहे. 1 जानेवारीपासून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यावर जीएसटी आकारण्यात येणार आहे. याचा झटका फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या ग्राहकांना बसणार आहे. केंद्र सरकारने झोमॅटो आणि स्विगी सारख्या खाद्यपदार्थ वितरित करणाऱ्या ई कॉमर्स ऑपरेटर्सवर 5 टक्के जीएसटी लावला आहे(From January 1, it will be more expensive to order food from Zomato, Swiggy in Mumbai; Delivery charges will increase).

    मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून ऑनलाईन ऑर्डर करणे आता महाग पडणार आहे. झोमॅटो, स्विगीवरून जेवण मागवणे महागणार आहे. 1 जानेवारीपासून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यावर जीएसटी आकारण्यात येणार आहे. याचा झटका फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या ग्राहकांना बसणार आहे. केंद्र सरकारने झोमॅटो आणि स्विगी सारख्या खाद्यपदार्थ वितरित करणाऱ्या ई कॉमर्स ऑपरेटर्सवर 5 टक्के जीएसटी लावला आहे(From January 1, it will be more expensive to order food from Zomato, Swiggy in Mumbai; Delivery charges will increase).

    सध्या रेस्टॉरंट हा कर भरतात, मात्र नवीन नियमानुसार फूड डिलिव्हरी ई-कॉमर्स ऑपरेटर्स हा कर भरतील, असा नियम करण्यात आला आहे. फूड टेक कंपन्यामुळे सरकारचा मोठा कर तोटा होत आहे. हा तोटा सुमारे 2 हजार कोटींचा आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आता जीएसटी आकारण्यात येणार आहे.

    दरम्यान, मात्र फूड डिलिव्हरी अॅप्स ग्राहकांकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा कर वसूल करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर करणे महाग होण्याची शक्यता आहे.