कोरोनास्थिती पहिल्या टप्प्याची असताना मुंबईत तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध का ? एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांचा ठाकरे सरकारला सवाल

नवी मुंबई आणि ठाण्यात व्यापारावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र मुंबईत(Mumbai) निर्बंध शिथील न झाल्याने मुंबईतील व्यापारी वर्ग ठाकरे सरकारवर (Thakre Government) नाराज आहे.

    मुंबई : कोरोना परिस्थिती(Corona Situation) पहिल्या टप्प्याची असताना शहरात तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध (Restrictions In Mumbai) कशासाठी आहेत असा सवाल व्यापारी संघटनाचे अध्यक्ष विरेन शहा यांनी केला आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात व्यापारावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र मुंबईत(Mumbai) निर्बंध शिथील न झाल्याने मुंबईतील व्यापारी वर्ग ठाकरे सरकारवर (Thakre Government) नाराज आहे.

    ‘ब्रेक द चेन’च्या(Break The Chain) नियमावली तातडीने दुसऱ्या स्तराचा समावेश करून व्यापाऱ्यांना अधिक मोकळीक द्यावी अशी मागणी एफआरटीएचे(FRTA) अध्यक्ष विरेन शाह(Viren Shah) यांनी केली आहे.

    विरेन शाह यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई आणि ठाण्यात व्यापारावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, मुंबईतील व्यापारी निर्बंधांमुळे खड्ड्यात जात आहे. हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदारांचे हजारो कोट्यावधीचे नुकसान झाले आहे, असेही विरेन शाह यांनी म्हटले आहे.