केईएममधील धक्कादायक प्रकार,कोरोना किटमध्ये बुरशीजन्य पदार्थ सापडल्याने वाढला रुग्णांचा मनस्ताप

कोरोना रुग्णांच्या(corona patients) वाढत्या संख्येमुळे मागील काही दिवसांपासून अधिकाधिक चाचण्या करण्यावर आराेग्य विभागाकडून भर देण्यात येत आहे. मात्र केईएम रुग्णालयात(fungal in corona kit at KEM) कोरोना किटमध्ये येत असलेल्या बुरशीमुळे रुग्णांना चाचणीसाठी रुग्णालयात दोनवेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत.

  मुंबई: कोरोना रुग्णांच्या(corona patients) वाढत्या संख्येमुळे मागील काही दिवसांपासून अधिकाधिक चाचण्या करण्यावर आराेग्य विभागाकडून भर देण्यात येत आहे. मात्र केईएम रुग्णालयात कोरोना किटमध्ये येत असलेल्या बुरशीमुळे रुग्णांना चाचणीसाठी रुग्णालयात दोनवेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत. बुरशीमुळे नमुने बाद ठरवण्यात येत असल्याने दररोज किमान १० रुग्णांना दुसऱ्यांदा स्वॅब घेण्यासाठी बोलावण्यात येत आहे. त्यामुळे संशयित कोरोना रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना काेविड चाचणी किंवा कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. मात्र केईएम रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेलेल्या अनेक रुग्णांना दोनवेळा चाचण्या कराव्या लागत असल्याचे नुकतेच समाेर आले आहे.

  व्हिटीएममध्ये बुरशी येत असल्याने अनेक स्वॅब बाद !
  आरटीपीसीआर चाचणीमध्ये महत्त्वाचे असलेल्या व्हिटीएममध्ये काही दिवसांपासून बुरशी येण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. व्हिटीएममध्ये फंगल येत असल्याने अनेक स्वॅब हे बाद ठरवण्यात येत आहेत. स्वॅब बाद ठरवण्यात आल्याने आरटीपीसीआर चाचणीसाठी नागरिकांना पुन्हा बोलवण्यात येत आहे. काही दिवसांपासून केईएम रुग्णालयात दररोज ८ ते १० नागरिकांना दूरध्वनी करून पुन्हा चाचणीसाठी बोलवले जात आहे. तसेच चाचणीचा अहवाल नेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा पुन्हा स्वब घेण्यात येत आहे. स्वॅब घेण्यासाठी पुन्हा बोलावण्यात येणाऱ्या नागरिकांना तांत्रिक कारणामुळे पुन्हा स्बॅब घेण्यात येत असल्याचे बाेलले जात आहे. कोरोना चाचणीमुळे मानसिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्णांना चाचणीसाठी दोनदा बोलावण्यात येत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  व्हिटीएम कालबाह्य अथवा हाताळणी व्यवस्थित नसल्याची शक्यता ?
  वाढत्या रुग्णसंख्येवर नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याची आवाहन केले जात असताना आरटीपीसीआर चाचणीसाठी महत्त्वाच्या असलेल्या व्हिटीएममध्ये फंगल सापडत असल्याने पालिकेकडून चाचण्याबाबत काळजी घेण्याबाबत कानाडाेळा केला जात असावा,असे दिसून येत आहे. व्हिटीएम या कालबाह्य झाल्या असण्याची किंवा त्यांची हाताळणी व्यवस्थित होत नसल्याची काही वरिष्ठ डाॅक्टरांनी व्यक्त केली.

  रुग्णालय प्रशासनाचा नकार
  केईएम रुग्णालयात अशा प्रकारे कोणत्याही व्हीटीएममध्ये फंगल आलेले नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये एकही कीट खराब झाले नाही. मार्चमध्ये पाच खराब झाल्या त्यातील चार रुग्ण हे रुग्णालयात दाखल होते तर एक ओपीडीतील रुग्ण आहे. त्यामुळे यामध्ये तथ्य नाही, असे केईम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.

  स्वॅब रद्द होण्याची अन्य कारणे

  • स्वॅब घेतलेल्या ठिकाणांहून अर्जासोबत नमुना नसणे
  • रुग्णाच्या स्वॅबसोमत अर्ज नसणे
  • व्हिटीएममध्ये स्वॅब नसणे
  • स्वबचे नमुने लीक होणे
  • व्हिटीएममधील स्वॅबचे प्रमाण पुरेश नसणे