इंजेक्शन घेण्यास नकार देणाऱ्या आजोबांचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रुग्णालयातील एका बेडवर ते आराम करत आहेत. बेडवर आराम करत असताना त्यांच्याकडे एक नर्स आली आहे. ही नर्स आजोबांना भले मोठे इंजेक्शन टोचण्याचा प्रयत्न करतेय. नर्सच्या हातातील इंजेक्शन पाहून आजोबा चांगलेच वैतागले आहेत. ते इंजेक्शन घेण्यास टाळाटाळ करत आ

    मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करण्यावर सरकारकडून भर दिला जात आहे. सरकारकडून नागरिकांना सातत्याने लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र लसीकरणाला येणाऱ्या नागरिकांचे विविध अनुभव सद्यावैद्यकीय अधिकाऱ्यांना येत आहेत. अश्याच प्रकारे लसीकरणाला घाबरणाऱ्या लोकांसाठी एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इंजेक्शन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका आजोबांची झालेली फजिती दाखवण्यात आलेली आहे.


    इंजेक्शन घेण्यास आजोबांची टाळाटाळ

    या व्हिडीओमध्ये एक आजारी आजोबा दिसत आहेत. रुग्णालयातील एका बेडवर ते आराम करत आहेत. बेडवर आराम करत असताना त्यांच्याकडे एक नर्स आली आहे. ही नर्स आजोबांना भले मोठे इंजेक्शन टोचण्याचा प्रयत्न करतेय. नर्सच्या हातातील इंजेक्शन पाहून आजोबा चांगलेच वैतागले आहेत. ते इंजेक्शन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांनी नर्ससोबत हुज्जतसुद्धा घातल्याचे दिसतेय. नंतर वैतागून ते बेडवर उठून बाहेर जाण्यासाठी निघाले आहेत. डॉक्टरला आवाज देत ते रुमच्या बाहेर पडत आहेत.

    आजोबा तावातावाने बाहेर जात असताना ते दरवाजाजवळ पोहोचले आहेत. तसेच दरवाजा उघडणार तोच मागे उभ्या असलेल्या नर्सने त्यांच्या दिशेने तिच्या हातातील इंजेक्शन भिरकावले आहे. इंजेक्शन फेकल्यानंतर ते थेट काकांच्या कंबरेत घुसले आहे. नंतर काकांनी ओरडून नर्सकडे आपला चेहरा केला आहे. तोच मागून डॉक्टरने दरवाजा उघडल्यामुळे कंबरेत घुसलेल्या इंजेक्शनवर दाब पडला आहे आणि ते इंजेक्शन काकांच्या कंबरेत पूर्णपणे रिकामे झाले आहे. इंजेक्शन घेण्याची इच्छा नसतानाही अशा प्रकारे इंजेक्शन टोचल्यामुळे काका अतिशय वैतागले आहेत.

    या व्हिडीओपाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आयपीएस ऑफिसर रुपीन शर्मा यांनी ट्विट केला आहे. लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत.