Journalist Welfare Fund

दरवर्षीप्रमाणे समुद्रकिनाऱ्यावर यंदा देखील बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आलं मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये बाप्पाच्या मूर्ती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात परत येताना पाहायला मिळत असतात.मात्र यंदा समुद्रकिनाऱ्यावर बाप्पांच्या मूर्ती कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे याचं कारण म्हणजे राज्य शासनाने आणि पालिका प्रशासनाने केलेले नियोजन.

    मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) उद्या होणार्‍या अनंत चतुर्थी निमित्त पूर्ण तयारी करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून कृत्रिम तलावाची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. सार्वजनिक मंडळाकरिता वेगळे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. लोकांना विनंती आहे की त्यांनी समुद्र किनार्‍यावर जाऊन गणपती विसर्जन (Ganpati Immersion) करण्याचा हट्ट करू नये.  . तसेच राज्य सरकारने दिलेल्या सर्व कोरोना नियमाचे पालन करावे, असे मत महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी मांडले आहे.

    दरवर्षीप्रमाणे समुद्रकिनाऱ्यावर यंदा देखील बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आलं मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये बाप्पाच्या मूर्ती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात परत येताना पाहायला मिळत असतात.मात्र यंदा समुद्रकिनाऱ्यावर बाप्पांच्या मूर्ती कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे याचं कारण म्हणजे राज्य शासनाने आणि पालिका प्रशासनाने केलेले नियोजन. अनेक ठिकाणी पालिका प्रशासनाने कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे यामुळे समुद्रात विसर्जित करण्यात येणाऱ्या घरगुती मूर्त्यांची संख्या घटली आहे त्यामुळे यंदा समुद्रावर होणार प्रदूषण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा करण्यात आला त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ते प्रमाण देखील कमी असलेले पाहायला मिळाले येत्या काळात यापेक्षाही कमी मुर्त्या समुद्रात विसर्जन व्हाव्या आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा वसमत महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी व्यक्त केले.