गौरव देवेंद्रलाल वाणी, सतेज पाटलांना काँग्रेसची उमेदवारी; भाजपचे अमरीश पटेल,अमल महाडिक यांच्याशी होणार सामना

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या जागांचा समावेश असून कोल्हापूरमधून अपेक्षेप्रमाणे राज्याचे गृहराज्य मंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून धुळे-नंदुरबारसाठी गौरव देवेंद्रलाल वाणी(Gaurav Devendralal Vani) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

    मुंबई : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या जागांचा समावेश असून कोल्हापूरमधून अपेक्षेप्रमाणे राज्याचे गृहराज्य मंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील(Satej Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून धुळे-नंदुरबारसाठी गौरव देवेंद्रलाल वाणी(Gaurav Devendralal Vani) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

    काँग्रेसने ज्या दोन जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत त्या दोन जागांवर भाजपने आपले उमेदवार या आधीच जाहीर केले आहेत.

    त्यानुसार कोल्हापुरातून पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा सामना भाजपचे अमल महाडिक यांच्याशी होणार आहे. तर धुळे-नंदुरबार येथे काँग्रेसच्या गौरव देवेंद्रलाल वाणी यांचा सामना अमरीश पटेल यांच्याशी होणार आहे.