लहान मुलांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना दिलेली फाशीची शिक्षा योग्यच; राज्य सरकारकडून शिक्षेचे समर्थन

लहान मुलांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना दिलेली फाशीचीच शिक्षाच योग्य असल्याचे समर्थन बधवारी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केले. १३ लहान मुलांचे अपहरण करून त्यापैकी ९ बालकांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या बहिणी रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर होत असल्यास त्यांना शिक्षेत कोणतीही सवलत देऊ नका जेणेकरून त्या बाहेर पडतील हे विधान राज्य सरकारने मागे घेतले(Gavit sisters who kidnapped and brutally murdered children deserved the death penalty).

    मुंबई : लहान मुलांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना दिलेली फाशीचीच शिक्षाच योग्य असल्याचे समर्थन बधवारी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केले. १३ लहान मुलांचे अपहरण करून त्यापैकी ९ बालकांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या बहिणी रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर होत असल्यास त्यांना शिक्षेत कोणतीही सवलत देऊ नका जेणेकरून त्या बाहेर पडतील हे विधान राज्य सरकारने मागे घेतले(Gavit sisters who kidnapped and brutally murdered children deserved the death penalty).

    महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितसोबत विविध ठिकाणाहून 13 बालकांचे अपहरण करून त्यापैकी ९ जणांची हत्या केली. साल २००१ मध्येत्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही साल २००६ मध्ये त्यांची फाशी कायम ठेवली. आरोपी अंजना गावित आणि तिच्या दोन मुलींनी भीक मागण्यासाठी या मुलांचे अपहरण केले. ज्या मुलांनी पैसे कमावणे बंद केले त्यांची दगडावर आपटून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पुढे पैशांवरून वाद निर्माण झाल्याने रेणुका शिंदेंचा नवरा त्यांच्यातून फुटला आणि पोलिसांना माहिती दिली. त्याला पोलिसांनी माफीचा साक्षीदार बनवले. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यानच अंजनाबाईचा मृत्यू झाला होता.

    २० वर्षांपूर्वी दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अद्याप अंमलबाजावणी न झाल्याने आरोपींची आता जगण्याची इच्छा आणि अपेक्षा वाढली असल्याचे सांगत फाशी रद्द करण्याची मागणी कऱणारी याचिका रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेली या दोघींची आई अंजनाबाई गावित हिचा शिक्षा भोगत असतानाच जेलमध्येच मृत्यू झाला होता. गावित बहिणींची दया याचिका राष्ट्रपतींनी साल २०१४ सालीच फेटाळली होती. या प्रकरणी आता या दोघी बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात दयेची याचिका केली आहे.

    जवळपास आठ वर्षांपासून या दोन्ही बहिणींच्या दयेचा अर्ज राष्ट्रपती कार्यालयात पडून होता. त्याचबरोबर या दोन बहिणींसारखी अन्य २० अशी प्रकरणे आहेत. ज्यात आरोपींच्या बाजून न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणांचा दाखला गावित बहिणींच्या वकीलांनी न्यायलया़त दिला आहे. मात्र, फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे जन्मठेपेत रूपांतर केल्यास त्यांना कोणतीही सवलत देऊ नका, हे विधान राज्य सरकारने मागे घेत दोन्ही बहिणांना दिलेली फाशी योग्य असल्याचे सांगत राज्य सरकारने फाशीचे समर्थन केले आहे.