पाकिस्तानातील ३५० ते ४०० आतंकवादी घुसखोरीच्या तयारीत, जनरल एमएम नरवणेंची धक्कादायक माहिती

पाकिस्तानमधील ३५० ते ४०० आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याचा इशारा संरक्षण दलप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम, शस्त्रसंधीचे उल्लंघनाबाबत करार झाला आहे. परंतु पाकिस्तानमधील आतंकवादी सीमा सुरक्षा रेषेजवळ घुसखोरी करण्यासाठी तयारच आहेत. एवढ्या मोठ्या संख्येन आतंकवादी येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली : भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तान हा सीमारेषेवर नेहमी कुरापती करत असतो, दहशदवाद्यांना फूस लावत पाक भारताविरोधात कारवाया करत असल्याचे अनेक पुरावे दिले आहेत. आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमधील ३५० ते ४०० आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याचा इशारा संरक्षण दलप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम, शस्त्रसंधीचे उल्लंघनाबाबत करार झाला आहे. परंतु पाकिस्तानमधील आतंकवादी सीमा सुरक्षा रेषेजवळ घुसखोरी करण्यासाठी तयारच आहेत. एवढ्या मोठ्या संख्येन आतंकवादी येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    दरम्यान, मागील वर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत युद्धविराम, शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याबाबत जो समझोता करार झाला होता. त्याचा दोन्ही देशांना फायदा झाला आणि त्यामुळेच देशात शांतता होती. परंतु नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होतच होते असे जनरल नरवणे यांनी माध्यमांना सामोरी जाताना सांगितले. तसेच एलओसीवर पाकिस्तानच्या बाजूने वेगवेगळ्या लॉन्च पॅडवर ४०० आतंकवादी आहेत. जे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पाकिस्तानचे मनसुबे काय आहेत. याबाबतची माहिती समोर आली आहे. भारताचे दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण आहे. पण हे पाकचे नापक इरादे भारत हाणून पाडेल असं सुद्धा जनरल नरवणे यांनी सांगितले.

    जर काय भारतावर दहशतवादी हल्ला केला तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. सीमेवर ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रे आणि रसद पुरवण्यासाठी करण्यात येत असल्याचे जनरल नरवणे यांनी सांगितले आहे. पाकिस्तान जोपर्यंत एनजे-9842 प्वॉइंटच्या पलिकडे एजीपीएल म्हणजेच वास्तविक ग्राउंड पोझिशन लाईनवरील ताबा स्वीकारत नाही आणि त्यावर लिखीत सही करत नाही. तोपर्यतंत सियाचीन ग्लेशियर निशस्त्र करण्यात येणार नाही असे नरवणे यांनी म्हटले.