धक्कादायक! वसतिगृहात विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या, आरोपीची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

मुंबईतील मुलींच्या वसतिगृहात १८ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सुरक्षारक्षक वसतिगृहातून आरोपी बेपत्ता होते. आरोपी गार्डने ६ जून रोजी सायंकाळी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.

  मुंबई :  दक्षिण मुंबईतुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  मुलींच्या वसतिगृहात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली (Mumbai Hostel Girl Murder News) आहे. वसतिगृहाच्या खोलीतच तिच्य गळ्यात स्कार्फ बांधलेला मृतदेह आढळून आला. चौकशी दरम्यान वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याच निदर्शनास आलं आहे. त्याचा मृतदेह चर्नी रोड स्थानकाजवळ ट्रॅकवर आढळून आला.

  दक्षिण मुंबईतील घटना

  मृत विद्यार्थिनी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. ती पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता वसतिगृहातील विद्यार्थिनीसोबत तिचे शेवटचे बोलणे झाले होते. काल सध्यांकाळच्या सुमारास वसतिगृहाच्या खोलीत एका बेपत्ता मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली. खोलीला बाहेरून कुलूप होते. तिच्या गळ्यात स्कार्फ बांधला होता. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तसेच या घटनेपासून एक वसतिगृहातील सुरक्षा रक्षकही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळवला. दरम्यान वसतिगृहात काम करणाऱ्या ओमप्रकाश कनौजिया (वय 30) याने आधी विद्यार्थिनीवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केल्याचं निष्पन्न झाले.

  सुरक्षा रक्षकही होता बेपत्ता

  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या दरम्यान सुरक्षा रक्षकही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलीवर अत्याचार आणि हत्या केल्यानंतर तो अवघ्या 10 मिनिटांत तो नेताजी सुभाष रोडवरील वसतिगृहाच्या पाठीमागे चर्नी रोड स्थानकात गेला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून चर्चगेटकडून येणाऱ्या रेल्वेसमोर उडी मारली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना त्याचा मृतदेह रुळाच्या कडेला आढळून आला. कनोजिया हा गेले 15 वर्षांपासून येथे कार्यरत होते.

  जीटी रुग्णालयात  होणाक शवविच्छेदन

  पोलिसांनी आरोपीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जीटी रुग्णालयात पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी होता.  त्याचे आई-वडील कुलाबा येथे राहतात. या प्रकरणी सध्या  मरीन ड्राईव्ह पोलीस त्याची चौकशी करत आहेत.