Give "Maharashtra Bhushan" award to Cyrus Punawala of Serum Institute; Demand of MNS leader Bala Nandgaonka

सायरस पुनावाला यांना १९६७ साली टीटॅनस लसीची निर्मिती करत कंपनीची सुरुवात केली. त्यानंतर सर्पदंशावर मात करणारे एंटीडोट्स, त्यानंतर टीबी, हेपिटायटिस, पोलिओ आणि फ्ल्यूसाठी डोस तयार करण्यात आले. पुण्यात असलेल्या घोड्याच्या फार्मचे रुपांतर लसनिर्मिती कंपनीत झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा वापर करत, गरीब देशांना स्वस्तात लसींचा पुरवठ्याचे कंत्राट पुनावाला यांनी युनिसेफ आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्याकडून मिळविले.

मुंबई : सिरम इन्स्टिट्युटच्या सायरस पुनावालांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार द्याअशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. नांदगावकरांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.

सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असल्याचे नांदगावकरांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.

असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी ट्विट करत केली आहे.

दरम्यान, सिंगापूरच्या आघाडीच्या वृत्तपत्राने सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

कोण आहेत सायरस पुनावाला?

सायरस पुनावाला यांना १९६७ साली टीटॅनस लसीची निर्मिती करत कंपनीची सुरुवात केली. त्यानंतर सर्पदंशावर मात करणारे एंटीडोट्स, त्यानंतर टीबी, हेपिटायटिस, पोलिओ आणि फ्ल्यूसाठी डोस तयार करण्यात आले. पुण्यात असलेल्या घोड्याच्या फार्मचे रुपांतर लसनिर्मिती कंपनीत झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा वापर करत, गरीब देशांना स्वस्तात लसींचा पुरवठ्याचे कंत्राट पुनावाला यांनी युनिसेफ आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्याकडून मिळविले.

जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या ‘सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने’ ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्रा झेनेका यांच्या सहकार्याने कोविड-१९वर ‘कोविशिल्ड’ नावाने लस विकसित केली आहे. ब्रिटीश सरकारकडून या लसीला मान्यता देण्यात आली आहे. ही लस ९० टक्के प्रभावी असून कोरोनाच्या नव्या प्रकारावर देखील प्रभावी ठरणार असल्याचा दावा केला जात आहे.