मुंबईकरांसाठी खूशखबर, कोरोनाचा वेग ओसरतोय, पॉझिटिव्हिटी रेट २८ टक्क्यांवरुन १८.७ टक्के, ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत

राज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी संगितले की, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रेकॉर्ड स्तरावर पोहचली आहे. आणि त्यामुळे कोविड-१९ची तिसरी लाट स्थिर होण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या कडेवारीत आगामी काळत अधिक घट होण्याची आशा आहे. गेल्या काही दिवसांत पॉटिव्हिटी रेट २५ टक्के होता, आता हा दर अधिक कमी होण्याची आशा आहे.

    मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोविड रुग्णांच्या संख्येत घट दिसते आहे. मुंबईत मंगळवारी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर २८ टक्क्यांवरुन घटून १८.७ टक्के इतकी झाली आहे. सोमवारी अधिक चाचण्या होऊनही कोरोना रुग्णांची संख्या कमी समोर आली आहे. सोमवारी १३,६४८ रुग्ण सापडले होते, तर मंगळवारी ११,६४७ रुग्ण सापडले होते. यातील ९६६७ (८३ टक्के) रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. सोमवारी पॉझिटिव्हिटी दर २३.०३ टक्के होता. मंगळवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

    लवकरच तिसरी लाट स्थिर होईल : तज्ज्ञ

    राज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी संगितले की, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या रेकॉर्ड स्तरावर पोहचली आहे. आणि त्यामुळे कोविड-१९ची तिसरी लाट स्थिर होण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या कडेवारीत आगामी काळत अधिक घट होण्याची आशा आहे. गेल्या काही दिवसांत पॉटिव्हिटी रेट २५ टक्के होता, आता हा दर अधिक कमी होण्याची आशा आहे. तीन कारणांमुळे रुग्णसंख्या कमी होत.

    असल्याचा अंदाज आहे.

    • बरेच जण हे घरी आहेत, आणि स्वताहून विलिगीकरणात गेले आहेत, तसेच ते चाचणीही करत नाहीयेत.
    •  अनेकजण स्वताहून आपली घरीच चाचणी करत आहेत, त्याचा रिपोर्ट ते यंत्रणेला देत नाहीयेत.
    •  खरी रुग्णांची संख्या किती आहे, याची यंत्रणेला अजिबात माहिती नाहीये.
    • ७ जानेवारीपासून रुग्णसंख्येत घट
    • कोरोना रुग्णांच्या संख्येत ७ जानेवारीपासून घट दिसते आहे. शुक्रवारी शहरात २०,७९१ रुग्ण होते, ते शनिवारी २०,३१८ वर आले. रविवारी हा कडा १९,४७४ वर आला. तर सोमवारी ही संख्या आणखी घटली, त्या दिवशी १३,६४८ रुग्ण सापडले.
    • कोरोनाविरुद्धच्या युद्धात मुंबई महापालिकेने आत्तापर्यंत ३००० कोटी खर्च केले आहेत. आता तिसऱ्या लाटेत मुकाबला करण्यासाठी, ३०० कोटी आपत्कालीन फंडाची मागणी केली होती. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आला आहे. यापूर्वीही असे आपत्कालीन ४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.