Gopichand Padalkar, Sadabhau Khot will stay at Azad Maidan tonight and think; Will ST workers call off strike? Will announce tomorrow morning

एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ सरकारने केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजारांची वाढ करत महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचा निर्णय जाहीर करताना 14 दिवस सुरु असलेला संप मागे घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. मात्र, एस.टी कर्मचारी विलणीकरणावर ठाम आहेत. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांशी भेट घेवून उद्या सकाळी ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भूमिका मांडणार असल्याचे जाहीर केले  (Biggest pay rise in ST’s history! Will ST workers call off strike? Gopichand Padalkar and Sadabhau Khot will announce ).

    मुंबई : एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ सरकारने केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजारांची वाढ करत महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचा निर्णय जाहीर करताना 14 दिवस सुरु असलेला संप मागे घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. मात्र, एस.टी कर्मचारी विलणीकरणावर ठाम आहेत. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांशी भेट घेवून उद्या सकाळी ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भूमिका मांडणार असल्याचे जाहीर केले  (Biggest pay rise in ST’s history! Will ST workers call off strike? Gopichand Padalkar and Sadabhau Khot will announce ).

    आज रात्रभर आझाद मैदानात थांबून एसटीच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांशी रात्रभर चर्चा करणार आहोत. तसेच योग्य विचार करुन उद्या सकाळी ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भूमिका मांडणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगीतले. यामुळे आजची रात्रही संपाची शेवटची रात्र ठरते की नेमकं काय होते हे उद्या सकाळीच स्पष्ट होईल.

    पगारवाढीसह निलंबन मागे घेणार, सेवा समाप्ती मागे घेणार अशी घोषणा अनिल परब यांनी केलीय. सर्व कामगारांनी संप मागे घ्यावा. उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर रहा असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील निलंबन आणि बडर्फीची कारवाई मागे घेणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केले आहे.

    परिवहन मंत्र्यांच्या घोषणे नंतर देखील एसटी कर्मचा-यांचा आंदोलन मागे घेण्यास नकार आहे. पगारवाढीचे गाजर नको विलीनीकरण हवं असे कर्मचारी म्हणाले. ही वेतनवाढ आम्हाला अजिबात मान्य नाही. सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. विलिनीकरण झालं तर जनतेलाही फायदा होणार आहे. बसच्या तिकिटात 40 टक्के कमी होईल असा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

    आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी दिली होती. मात्र, सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.