
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग आणि बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. गोरेगाव कथित खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले(Goregaon ransom case: First chargesheet filed against Sachin Waze, Parambir Singh). गुन्हे शाखा युनिट 11 संबंधित कारवाई करत असून या आरोपपत्रात आणखी काही नावांचा समावेश करण्यात आला आहे. सिंग यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणी जबाब नोंदवला होता.
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग आणि बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. गोरेगाव कथित खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले(Goregaon ransom case: First chargesheet filed against Sachin Waze, Parambir Singh). गुन्हे शाखा युनिट 11 संबंधित कारवाई करत असून या आरोपपत्रात आणखी काही नावांचा समावेश करण्यात आला आहे. सिंग यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणी जबाब नोंदवला होता.
गोरेगाव खंडणी प्रकरणात एकूण आतापर्यंत 6 आरोपी आहेत. परमबीर सिंग, सचिन वाझे, रियाझ भाटी, विनय सिंग, अल्पेश आणि चिंटू हे प्रमुख आरोपी आहेत. 1 हजार 895 पानांच हे दोषारोपपत्र जबाबासहित किला कोर्टात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील दोघे अद्याप फरार आहेत. त्यांच्या नावे अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. दरम्यान, राज्य सरकारने परमबीर यांना कामांतील अनियमिततेचा ठपका ठेवत निलंबीत केले.
मात्र, हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा करत परमबीर यांनी निलंबनाची नोटीस घेण्यास नकार दिला होता. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी निलंबनाची नोटीस स्वीकारली. गृह विभागाकडून करण्यात आलेले निलंबन बेकायदेशीर असल्याचे परमबीर सिंग यांचे म्हणणे आहे. निलंबनाच्या विरोधात परमबीर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असून यासंदर्भात तज्ञ वकिलांकडून मार्गदर्शन घेत आहेत.