वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबाला सरकारकडून 15 लाखांची मदत जाहीर

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रती संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित केले. वनसंरक्षक स्वाती ढुमणे या तीन कामगारांसोबत सकाळी जंगलात पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. साधारणत: चार किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर त्यांना रस्त्याच्या मधोमध एक वाघीण बसल्याची दिसली.

    मुंबई – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कर्तव्यावर असताना वनसंरक्षक वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले. मृत ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जाहीर केले.

    ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रती संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित केले.

    वनसंरक्षक स्वाती ढुमणे या तीन कामगारांसोबत सकाळी जंगलात पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. साधारणत: चार किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर त्यांना रस्त्याच्या मधोमध एक वाघीण बसल्याची दिसली. त्यावेळी जवळपास ३० मिनिटे हे सर्वजण वाघापासून काही फर्लांग दूर तसेच थांबले. परंतु वाघाची काहीच हालचाल दिसेना तसेच तो रस्त्यावरून हटेना. त्यामुळे अखेर या चारही जणांनी झाडा झुडपातून चालण्यास सुरुवात केली.

    कामगार पुढे चालत होते. तर त्यांच्या मागून वनसंरक्षक स्वाती ढुमणे या चालत होत्या. मात्र काही अंतर पुढे चालल्यानंतर रस्त्यावर बसलेल्या त्या वाघाने अचानक पाठीमागून ढुमणे यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना फरफटत काही अंतर आत जंगलात नेले. या हल्ल्यात त्यांचा मुत्यू झाला.