पर्यटकांना सरकारचा दिलासा ; राज्यात कंटेन्मेंट झोनबाहेर ‘या’ स्थळांना देता येणार भेटी

बोटींग, अम्युजमेंट पार्क आणि पर्यटनस्थळी इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनवर्सन मंत्रालयाने याबाबतचे पत्रक जारी केले आहे.

मुंबई: कोरोनाचे सावट अद्याप टळलेले नसले तरी वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी ट्रीपचे नियोजन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, बोटींग, अम्युजमेंट पार्क आणि पर्यटनस्थळी इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनवर्सन मंत्रालयाने याबाबतचे पत्रक जारी केले आहे.

या सुविधा होणार सुरू?
कंटेन्मेंट झोनबाहेरील जलक्रीडा यात नौकानयन आणि इतर मनोरंजन खेळांना परवानगी देण्यात आली आहे.
कंटेन्मेंट झोन बाहेरील अम्युजमेंट पार्क, पर्यटनस्थळावरील इनडोअन मनोरंजनाचे कार्यक्रम यांना परवानगी देण्यात आली आहे.
कंटेन्मेंट झोन बाहेरील पर्यटन स्थळ देखील सुरु करण्याची परवानगी

हे सर्व सरु करत असतानाच सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन होईल याची काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.