सरकार समाजासोबत असल्याने सकल मराठा आंदोलन मागे घेण्याची सरकारची विनंती : अशोक चव्हाण

मराटा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर सरकार समाजासोबत असल्याने  आंदोलन मागे घेण्याची विनंती सरकारने केल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यानी दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितिच्या सदस्यांसोबत छत्रपती संभाजीराजे याची सुमारे दोन तास चर्चा झाल्याची माहिती...

    मुंबई (Mumbai).  मराटा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर सरकार समाजासोबत असल्याने  आंदोलन मागे घेण्याची विनंती सरकारने केल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यानी दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितिच्या सदस्यांसोबत छत्रपती संभाजीराजे याची सुमारे दोन तास चर्चा झाल्याची माहिती उपसमितीचे प्रमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यानी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

    केंद्र सरकारने निर्णय घ्यावा म्हणून पाठपुरावा
    चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात जो पेच निर्णय झाला आहे, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून विनंती करण्यात आल्याचे संभाजीराजे यांना मुख्यमंत्री यांनी अवगत केले आहे. याशिवाय त्या बाबत संसदेच्या मार्गाने अथवा न्यायालयात फेरविचार याचिका करून मार्ग काढण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा म्हणून पाठपुरावा केला जात आहे.

    न्यायालयाने परवानगी दिलेल्या पदांची भरती
    ते म्हणाले की समाजाच्या नोक-या संदर्भात लवकरच अध्यादेश काढून न्यायालयाने परवानगी दिलेल्या पदांची भरती तातडीने केली जात आहे, या शिवाय अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि सारथी च्या कामाला गती देण्यासाठी संबंधीत मंत्र्यासोबत समन्वयाने बैठका घेवून हे विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. सरकार पूर्णत: समाजासोबत असल्याने आंदोलन करण्याची गरज नाही सकारात्मक पध्दतीने सा-या प्रश्नांतून कायद्याच्या चौकटीत मार्ग काढण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.