parambeer singh

मुंबईचे माजी पोलिस आयुंक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे एक पत्र पाठवलं. त्या पत्रात गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिल्याचा उल्लेख होता. या पत्राची एक प्रत त्यांनी राज्यपाल कार्यालयादेखील पाठवली होती. त्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात खळबळ उडाली होती. मात्र आता ते पत्र परमबीर सिंग यांच्या प्रचलित ईमेलवरून आलं नसून वेगळ्याच आयडीवरून आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलंय. 

  महाराष्ट्राच्या राजकारणात धमाका उडवून देणारं मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं पत्र हे त्यांच्या ओरिजिनल ईमेल आयडीवरून न येता वेगळ्याच ईमेल आयडीवरून आलेलं असल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्री कार्यालयाला झाला. त्यामुळे त्या पत्राबाबत शहानिशा करणार असल्याचं सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय.

  मुंबईचे माजी पोलिस आयुंक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे एक पत्र पाठवलं. त्या पत्रात गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिल्याचा उल्लेख होता. या पत्राची एक प्रत त्यांनी राज्यपाल कार्यालयादेखील पाठवली होती. त्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात खळबळ उडाली होती. मात्र आता ते पत्र परमबीर सिंग यांच्या प्रचलित ईमेलवरून आलं नसून वेगळ्याच आयडीवरून आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलंय.

  परमबीर सिंग यांचा ईमेल पत्ता हा हॉटमेलचा आहे. parimbirs@hotmail.com असा परमबीर सिंगांचा वैयक्तिक ईमेल त्यांनी दिला आहे. मात्र सध्या आलेला ईमेल हा  paramirs3@gmail.com या ईमेल आयडीवरून आला आहे. शिवाय या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नसल्याचंदेखील स्पष्ट झालंय.

  परमबीर सिंह यांची पोलिस आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. आठ पानांच्या या पात्रात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वाझेंचं निलंबन रद्द करून पोलीस दलात परत घेतल्यानंतर वाझेना नेमकं काय टार्गेट देण्यात आलं, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

  पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या प्रकरणात परमबीर सिंह यांना अटक करावी, त्यांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

  या मागणीबरोबरच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. परमबीर सिंह यांच्या पत्राने गृहमंत्र्यांसमोरची आव्हाने वाढली आहेत. या प्रकरणात एनआयएची चौकशी सुरु झाल्यानंतर आणि वाझेंना याप्रकरणी अटक झाल्यानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी राष्टवादीने त्यांची पाठराखण केली होती. मात्र आता खुलेपणाने असे आरोप झाल्याने आणि पुरावे दिल्याने देशमुख अडचणीत आले आहेत.