सहकारी संस्थांचे सोयीने सरकारीकरण; देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सत्ताधारी कोरोनाचे कारण देत सहकारी संस्थाचे सोयीने सरकारीकरण करत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सभात्यागही केला(Governmentalization of co-operative societies; Serious allegations of Devendra Fadnavis).

  मुंबई : महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सत्ताधारी कोरोनाचे कारण देत सहकारी संस्थाचे सोयीने सरकारीकरण करत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सभात्यागही केला(Governmentalization of co-operative societies; Serious allegations of Devendra Fadnavis).

  नेमणुकीची मुदत दहा वर्षावरून 15 वर्षे

  जिथे सत्ताधाऱ्यांच्या सहकारी संस्था आहेत, तिथे ते सोयीनुसार नियम आणि बदल केला जात आहे. सहकारी संस्था विलीनीकरण आणि तेथील निवडणुका यामधे सत्ताधारी सोयीनुसार मतभेद करत आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला. दरम्यान, संस्थांवर नेमलेल्या अवसायकाला त्यांच्या नेमणुकीची मुदत दहा वर्षावरून 15 वर्षे करण्याची आणि कलम 157 अन्वये सरकारी नियंत्रण ठेवणे अशी तरतूद या विधेयकात आहे. कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांमधील लाभांश आणि इतर आर्थिक मंजुरीबाबत कार्यकारी मंडळाला दिलेले अधिकार तसेच लेखापरीक्षण 9 महिन्यात करण्यासाठी दिलेली सूट याला आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याचे विधेयक सभत्यागानंतर मंजूर करण्यात आले.

  समृद्धी महामार्गाच्या कामामुळे ग्रामीण रस्त्यांची चाळण

  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम करताना होणाऱ्या मालवाहतूकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे, अशी जोरदार तक्रार सर्वपक्षीय सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर संबंधित कंत्राटदारांकडून ते तातडीने दुरुस्त करून घेतले जातील अशी ग्वाही सार्वजनिक उपक्रम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

  वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या डंपर्समुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे दोन प्रश्न या तासात लागोपाठ उपस्थित करण्यात आले होते, त्यावर छापील उत्तरात मंत्र्यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे सदस्यांनी विशेषतः सत्तारूढ सदस्यांनी लक्षात आणून दिले. मात्र जिथे तक्रार असेल तिथे तातडीने दुरुस्ती केली जाईल, असे सार्वजनिक शिंदे यांनी सांगितले.

  वाशीम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतात समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाणी गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई द्या आणि पुन्हा पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यावर नुकसान भरपाई देऊ असेही मंत्री शिंदे म्हणाले.