Governor's initiative for Pai Wari; Called the Chief Secretary

पायी वारीच्या मागणीसाठी आचार्य तुषार भोसले यांच्यासह वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. यावेळी राज्यपालांनी याप्रकरणात थेट हस्तक्षेप करत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना फोन करुन सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. वारकरी संप्रदायाची मोजक्या संख्येत नियमांसह पायी वारीची मागणी रास्त असून परंपरा जोपासण्यासाठी सकारात्मक विचार करा अशा सूचना देत या शिष्टमंडळाची मुख्य सचिवांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्यात आली.

    मुंबई : पायी वारीच्या मागणीसाठी आचार्य तुषार भोसले यांच्यासह वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. यावेळी राज्यपालांनी याप्रकरणात थेट हस्तक्षेप करत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना फोन करुन सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. वारकरी संप्रदायाची मोजक्या संख्येत नियमांसह पायी वारीची मागणी रास्त असून परंपरा जोपासण्यासाठी सकारात्मक विचार करा अशा सूचना देत या शिष्टमंडळाची मुख्य सचिवांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्यात आली.

    या बैठकीला प्रधान सचिव असीम गुप्ता देखील उपस्थित होते. या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेचा अहवाल आजच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल आणि मुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील असे मुख्य सचिवांनी सांगितल्याचे शिष्टमंडळातील प्रतिनिधी ह.भ.प. संजय नाना महाराज धोंडगे यांनी सांगितले.