भांडुप ड्रीम्स मॉल आगीतील नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित भरपाई द्यावी : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

भांडुप पश्चिम येथील ड्रीम्स मॉलमध्ये सनराईझ रुग्णालयात आग लागून १२ जणांचा मृत्यू झाला. ड्रीम्स मॉल मधील दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मॉल मध्ये दैनिक सम्राट या आंबेडकरी चळवळीच्या आघाडीच्या दैनिकाच्या कार्यालयाचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्या सर्व नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

    मुंबई : भांडुप ड्रीम्स मॉल मधील सनराईझ रुग्णालय अग्निकांडात ड्रीम्स मॉल मधील सर्व दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यात दैनिक सम्राट या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्राच्या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे.त्या सर्वांना नुकसानभरपाई त्वरित द्यावी या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठविले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

    भांडुप पश्चिम येथील ड्रीम्स मॉलमध्ये सनराईझ रुग्णालयात आग लागून १२ जणांचा मृत्यू झाला. ड्रीम्स मॉल मधील दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मॉल मध्ये दैनिक सम्राट या आंबेडकरी चळवळीच्या आघाडीच्या दैनिकाच्या कार्यालयाचे ही मोठे नुकसान झाले आहे. त्या सर्व नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. ड्रीम्स मॉल मधील सन राईझ रुग्णालयातल्या आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर १० लाख रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याबाबत चे पत्र ते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.