महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पुढचे तीन महिने वीजतोडणी नाही; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा

महाविकास आघाडी सरकारने वीज तोडणीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. पुढील तीन महिने थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही, असे सांगत असतानाच ऊर्जामंत्री राऊत यांनी वीज कंपनीच्या तोट्याचा हिशेब सभागृहापुढे मांडला. विरोधी पक्षाने विधानसभेत शेतकऱ्यांची वीज तोडणीवरुन सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर मंत्री राऊत यांनी ही घोषणा केली(Great relief to farmers in Maharashtra! No power outages for next three months; Energy Minister Nitin Raut's announcement).

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारने वीज तोडणीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. पुढील तीन महिने थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही, असे सांगत असतानाच ऊर्जामंत्री राऊत यांनी वीज कंपनीच्या तोट्याचा हिशेब सभागृहापुढे मांडला. विरोधी पक्षाने विधानसभेत शेतकऱ्यांची वीज तोडणीवरुन सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर मंत्री राऊत यांनी ही घोषणा केली(Great relief to farmers in Maharashtra! No power outages for next three months; Energy Minister Nitin Raut’s announcement).

    राज्यात वीज खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांकडे ६४२३ कोटी रुपये थकीत आहेत. कृषीपंप असणाऱ्या ग्राहकांकडे डिसेंबरपर्यंत ४४ हजार ९२० कोटी रुपये थकबाकी आहे. एकूण ६४ हजार कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली आहे. थकबाकी भरण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात आल्या आहेत. वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उर्जामंत्र्यांनी सभागृहात दिली.

    स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ९०११ कोटी

    महावितरण कंपनीतर्फे राज्यात सुमारे ३ कोटी ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो. आत्तापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ९०११ कोटी रुपये, शासकीय कार्यालयांकडे २०७ कोटी रुपये थकीत आहेत, असे नितीन राऊत म्हणाले. महावितरण कंपनीची आर्थिक अडचण लक्षात घेऊन थकीत वीजबिल वेळेवर भरण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील त्यांनी केली.

    राज्य सरकारच्या या निर्णयाचे भाजपाने स्वागत केले आहे. आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आपण घेतलेला निर्णय हा अधिवेशन संपल्यानंतरही कायम रहावा एवढीच इच्छा,” असा मिश्किल टोला माजी अर्थमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांना लगावला आहे.