परमबीर सिंग यांना मोठा दिलासा! जामीनपात्र अटक वॉरंट रद्द मात्र, 15 हजाराचा दंड भरावा लागणार

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अखेर सोमवारी चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. चांदीवाल आयोगाने परमबीर यांच्याविरोधातील जामीनपात्र अटक वॉरंट रद्द करून त्यांना मोठा दिलासा दिला. मात्र, त्याचबरोबर गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना 15 हजारांचा दंड सुनावला(Great relief to Parambir Singh! Bail arrest warrant canceled, however, a fine of Rs 15,000 will have to be paid).

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अखेर सोमवारी चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. चांदीवाल आयोगाने परमबीर यांच्याविरोधातील जामीनपात्र अटक वॉरंट रद्द करून त्यांना मोठा दिलासा दिला. मात्र, त्याचबरोबर गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना 15 हजारांचा दंड सुनावला(Great relief to Parambir Singh! Bail arrest warrant canceled, however, a fine of Rs 15,000 will have to be paid).

    ही दंडस्वरूपातील रक्कम एका आठवड्यात मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची हमी परमबीर सिंह यांनी आयोगासमोर दिली. आजारपणामुळे यापूर्वी झालेल्या सुनावणीला आयोगासमोर हजर राहता आले नाही, असे कारण परमबीर यांनी आयोगासमोर दिले.

    तसेच जामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती अर्जाद्वारे केली. त्यानंतर न्या. चांदिवाल यांनी वॉरंट रद्द करणारा आदेश काढला, मात्र परमबीर यांना 15 हजार रुपयांचा दंडही सुनावला.