There is no police watch on Sameer Wankhede; Home Minister Dilip Walse Patil denied the allegations

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबई ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलीसांची चौकशी सुरू असून एनसीबीच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरांना एनसीबीने अटक केली मात्र या प्रकरणात किरण गोसावी यांच्याकडून खंडणी मागण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या प्रकरणी एनसीबीच्या या तपासाची मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे(Great shock to Sameer Wankhede! Mumbai police to probe Cardelia cruise drug ransom case; Announcement by Home Minister Dilip Walse Patil).

    मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबई ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलीसांची चौकशी सुरू असून एनसीबीच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरांना एनसीबीने अटक केली मात्र या प्रकरणात किरण गोसावी यांच्याकडून खंडणी मागण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या प्रकरणी एनसीबीच्या या तपासाची मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे(Great shock to Sameer Wankhede! Mumbai police to probe Cardelia cruise drug ransom case; Announcement by Home Minister Dilip Walse Patil).

    आर्यन खानवर कारवाई खंडणीसाठी झाल्याचा आरोप

    मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, तसेच या प्रकरणात एनसीबीकडून ज्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा म्हणून आधार घेण्यात आले होते त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नसल्याचे २८ ऑक्टोबरच्या आदेशाच्या प्रतीमध्ये म्हटले होते.  त्यापूर्वीच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. या प्रकरणातील एक पंच किरण गोसावी याच्यावरही गु्न्हे दाखल असून तो फरार असल्याचे समोर आले होते.

    नवाब मलिक यांच्याकडून आरोप सुरू असताना दुसरीकडे या प्रकरणाशी निगडित असलेल्या काही जणांकडूनही गौप्यस्फोट करण्यात येत होते. आर्यन खानवर झालेली कारवाई ही खंडणीसाठी झाल्याचाही आरोप होऊ लागला होता. त्यामुळे या प्रकरणात आता नेमके काय घडले याचा शोध मुंबई पोलीस घेत असून ही चौकशी निर्णायक स्थितीत पोहचली असल्याचे जाणकार सूत्रांनी सांगितले.