अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपालांकडून अभिवादन

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोरीवली (Borivli) , मुंबई (Mumbai) येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. अटल स्मृती उद्यान परिसराला भेट देऊन राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी खासदार गोपाल शेट्टी, लदाखचे खासदार जाम्यांग छेरिंग नामग्याल, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार सुनील राणे, भाई गिरकर, योगेश सागर व मनिषा चौधरी तसेच नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांनी अटल स्मृती उद्यानाला भेट देऊन तेथील वाजपेयी यांच्या जीवनावरील दृकश्राव्य प्रदर्शन पहिले. राज्यपालांनी तेथे निर्माण केलेली संसद भवनाची प्रतिकृती पहिली तसेच वाजपेयी यांच्या जीवनावरील आभासी प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला.