Guidance to farmers for control of fungal diseases; Information of Horticulture Minister Sandeepanrao Bhumare

बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन करण्यात आल्याचे फलोत्पादन मंत्री संदीपनराव भुमरे यांनी आज विधानसभेत सांगितले. सीताफळांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजना बाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य अमिन पटेल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता(Guidance to farmers for control of fungal diseases; Information of Horticulture Minister Sandeepanrao Bhumare).

    मुंबई : बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन करण्यात आल्याचे फलोत्पादन मंत्री संदीपनराव भुमरे यांनी आज विधानसभेत सांगितले. सीताफळांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजना बाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य अमिन पटेल यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता(Guidance to farmers for control of fungal diseases; Information of Horticulture Minister Sandeepanrao Bhumare).

    भुमरे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सीताफळांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

    मात्र, सीताफळांच्या झाडावर त्याचा दुष्परिणाम झालेला नाही. ९ ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्रात शेतकऱ्यांना या प्रश्नाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.