Shiv Sena Minister Gulabrao Patil's reaction to Yogi Adityanath's announcement of Film City

राज्यातील  सर्वपक्षीय नेत्यांची जिभ घसरण्याची जणू स्पर्धा लागली आहे. भाजपचे आशिष शेलार यांच्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत आणि आता जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतच वादाची ठिणगी पेटली आहे( Gulabrao Patil Contrvercy: If not public apology ... State Women's Commission warns of legal action against Gulabrao Patil ).

    मुंबई: राज्यातील  सर्वपक्षीय नेत्यांची जिभ घसरण्याची जणू स्पर्धा लागली आहे. भाजपचे आशिष शेलार यांच्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत आणि आता जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतच वादाची ठिणगी पेटली आहे( Gulabrao Patil Contrvercy: If not public apology … State Women’s Commission warns of legal action against Gulabrao Patil ).

    हेमा मालिनी यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य

    भाजपच्या खासदार आणि प्रसिध्द अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या बद्दल  अवमानकारक वक्तव्य केल्यावरून भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेत मंत्री पाटील यांना जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिल्याने सत्ताधारी शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी असा सामना आता रंगला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्री पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

    वक्तव्य निषेधार्ह जाहीर माफी मागावी

    मंत्री गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे वक्तव्य निषेधार्ह असून त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.  त्या म्हणाल्या की, एखाद्या वस्तूची तुलना महिलांच्या रंगरूपाशी करणे हे नीचपणाचे लक्षण आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देत आहात हे अत्यंत चुकीचे आहे. आपल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आपण आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा योग्य कारवाई करण्यात येईल असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्षाकडून मात्र या सा-या प्रकरणात काहीच प्रतिक्रिया आली नसली तरी शिवसेनाच्या मंत्र्यांना असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या चाकणकरांनी दिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे.