गुवाहटी-बिकानेर एक्स्प्रेसचा मोठा अपघात, 12 डबे घसरले, 5 जणांचा मृत्यू मदतकार्य सुरु

पश्चिम बंगालच्या जुलपाईगुडीमध्ये मैनगुडी परिसरात गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसला रेल्वेला मोठा अपघात झाला आहे. गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसचे बारा डबे रुळावरुन घसरल्याची माहिती एनडीआरएफच्या टीमनं दिली आहे. एनडीआरफचे डीजी अतुल करवल यांनी या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर, 50 प्रवासी जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती दिली आहे. गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसचे 12 डबे घसरल्याची माहिती समोर आली आहे एनडीआरफच्या टीम सोबत मदतकार्यासाठी बीएसफचे 200 जवानांचं पथक दाखल झालं

    कोलकाता : रेल्वेचा एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालच्या जुलपाईगुडीमध्ये मैनगुडी परिसरात गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसला रेल्वेला मोठा अपघात झाला आहे. गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसचे बारा डबे रुळावरुन घसरल्याची माहिती एनडीआरएफच्या टीमनं दिली आहे. एनडीआरफचे डीजी अतुल करवल यांनी या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर, 50 प्रवासी जखमी झाल्याचीही प्राथमिक माहिती दिली आहे. गुवाहटी बिकानेर एक्स्प्रेसचे 12 डबे घसरल्याची माहिती समोर आली आहे एनडीआरफच्या टीम सोबत मदतकार्यासाठी बीएसफचे 200 जवानांचं पथक दाखल झालं होतं. तर, याची माहिती मिळताच रेल्वेमंत्री घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळं हळहळ व्यक्ते केली जात आहे.

    दरम्यान, दुसरीकडे रेल्वेकडून हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असून मदतकार्यासंदर्भातील माहिती देखील दिल्याचं सांगितलं. मदतकार्यावर लक्ष ठेऊन असल्याचं देखील त्यांनी सांगितंलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेमुळं धक्का बसल्याचं सांगितलं आहे. मैनगुडीमध्ये बिकानेर गुवाहटी एक्स्प्रेसचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्या उत्तर बंगाल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी डीएम, एसपी, आयजी उत्तर बंगाल यांना मदत आणि बचाव कार्य करण्याचे आदेश देण्यात आल्याचं ममता बॅनर्जींनी ट्विट करुन म्हटलं आहे. तसेच त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

    तसेच या दुर्घटनेवरुन विविध प्रतिक्रिया येत आहेत. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी बिकानेर गुवाहटी एक्स्प्रेसच्या अपघाताची माहिती नरेंद्र मोदी यांना दिलीय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील रेल्वेमंत्र्यासोबत चर्चा केली आहे. आश्विनी वैष्णव पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. तर राजस्थानातून भवंरसिंह भाटी आणि गोविंद राम मेघवाल हे दोन मंत्री पश्चिम बंगालकडे रवाना झाले आहेत. रेल्वेकडून अपघातातील मृतांना आणि जखमींना मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी या अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच मृत्यांच्या कुटुंबाच्या दुखात आम्ही सहभागी असल्याचं म्हटलं आहे.