
निर्बंध लावण्याचे कोणतेही कारण नाही. आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचे पालन करत योग्य वर्तन ठेवणे गरजेचे आहे. ते जर पाळले तर अडचण येण्याचे कारण नाही”.“तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारी करत असून या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट संक्रमित एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले की, पहिला डेल्टा होता त्यानंतर डेल्टा प्लस आला, डेल्टाने त्याचे रुप बदललंय का? याच्याबाबत सध्या बारकाईनं अभ्यास सुरू आहे. ३७ जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला १०० नमुने घेतले आहेत. त्यांची ट्रॅवल हिस्ट्री, त्यांनी लसीकरण केले होते का? हे तपासलं जात आहे.
Out of 21 Delta Plus #COVID19 variant patients in Maharashtra, one 80-year-old with co-morbidities has died: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/qiSLlLwBjx
— ANI (@ANI) June 25, 2021
निर्बंध शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान मुख्यसचिवांनी राज्यातील प्रशासनाला कोरोना बाबत खबरदारी घेण्याबाबत नव्याने आदेश निर्गमित केले आहेत. डेल्टा प्लसमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याच्या शक्यता असल्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
तर अडचण येण्याचे कारण नाही
डेल्टा प्लसमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का? असे विचारण्यात आले असता राजेश टोपे यांनी सांगितले की, “निर्बंध लावण्याचे कोणतेही कारण नाही. आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचे पालन करत योग्य वर्तन ठेवणे गरजेचे आहे. ते जर पाळले तर अडचण येण्याचे कारण नाही”.“तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारी करत असून या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
डेल्टा प्लसचे आतापर्यंत २१ रुग्ण आढळले आहेत. पण हा व्हायरसमध्ये झालेला बदल (रिप्लेसमेंट) नाही. म्हणजे आधी डेल्टा होते आणि आता डेल्टा प्लसने त्याची जागा घेतली असे नाही. मोठ्या संख्येने रुग्ण नसले तरी शोध सुरु आहे. सर्व जिल्ह्यांमधून १०० नमुने घेऊन त्याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये लसीकरण केलेल्यांना पुन्हा संसर्ग झाला का वैगेरे अशी बाबी समजून घेत आहोत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे