Heavy rains in Mumbai; The meteorological department issued a warning

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. आजही जोरदार सरींनी मुंबईला झोडपले. मात्र कुठेही पाणी भरले नाही. रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत आहे(Heavy Rain In Mumbai).

    मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. आजही जोरदार सरींनी मुंबईला झोडपले. मात्र कुठेही पाणी भरले नाही. रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत आहे(Heavy Rain In Mumbai).

    येत्या २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

    आज दिवसभरात शहर भागात 14.54 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 20.66 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 17.65 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आज दिवसभर आभाळ काळवंडले होते. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र कुठेही पाणी भरले नाही. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होती.