दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाही, अशा प्रकारे पाहा आपला निकाल

दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा १८.८१ टक्के निकाल लागला आहे. या पुरवणी परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती.

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या घेतलेल्या पुरवणी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा १८.८१ टक्के निकाल लागला आहे. या पुरवणी परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती.

SCC आणि HSC गुण अशाप्रकारे पाहा

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.

होमपेजवरील “SSC Examination Result November 2020” किंवा “HSC Examination Result November 2020” लिंकवर क्लिक करा.

ही लिंक तुम्हाला निकालाच्या पेजवर डिरेक्ट करेल.

तेथे तुमचा रोल नंबर, जन्मतारीख भरुन लॉग इन करा.

तुमचा निकाल स्क्रीनवर झळकेल.

निकाल डाऊनलोड करा. तसंच तुम्ही निकालाची प्रिंटही घेऊ शकता.