२८ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला गर्भपातास परवानगी,वैद्यकीय अहवालानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

२८ आठवड्यांची गर्भवती असलेल्या एका अल्पवयीन मुलीला (Pregnant Minor Girl मुंबई उच्च न्यायालयाने गर्भपात(Court Gave Permission Of Abortion) करण्यास परवानगी दिली.

    मुंबई: बलात्कार(Rape Case) पीडिता आणि २८ आठवड्यांची गर्भवती असलेल्या एका अल्पवयीन मुलीला (Pregnant Minor Girl मुंबई उच्च न्यायालयाने गर्भपात(Court Gave Permission Of Abortion) करण्यास परवानगी दिली. सदर पीडितेला प्रसुतीदरम्यान जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल वैद्यकीय समितीकडून न्यायालयात सादर करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने गर्भपातास परवानगी दिली.

    पालघर येथे राहणाऱ्या या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या माता-पित्याचे दशकभरापूर्वी एका अपघात निधन झाले. तेव्हा, ती आपल्या मावशीकडे राहत आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय नराधमाने तिच्यासोबत पाशवी कृत्य केले. त्याबाबत पालघर पोलिसांनी भादंवी आणि पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, पीडितेची मानसिक आणि शारिरीक स्थिती अत्यंत नाजूक आहे. या परिस्थिती तिला पालघर ग्रामीण भागातून भायखळा येण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशी माहिती पीडितेच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने पिडितेची देखभाल करण्यासाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्याचे तसेच न्यायालयाच्या पुढील निर्देशानंतरच तिला डिस्चार्ज देण्यात येईल असेही स्पष्ट केले होते. तसेच न्यायालयाने जे.जे रुग्णालयातील वैद्यकीय समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

    त्यानुसार न्या. उज्जल भुयान आणि न्या. माधव जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, पीडिता आणि गर्भ यांच्यात कोणताही नाही. मात्र, पीडिता अल्पवयीन असल्याने ती गर्भधारणेमुळे त्रस्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. तसेच पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना गर्भधारणा आणि गर्भपातामुळे होणाऱ्या परिणामांची माहिती देण्यात आली असल्याचेही यावेळी राज्य सरकारचे वकिल हिमांशू टक्के यांनी न्यायालयाला माहिती देताना सांगितले. त्याची दखल घेत पीडितेला गर्भपातास परवानगी देत तिच्या आणि गर्भाच्या रक्ताने नमुने तपासणीसाठी ठेवण्याचे निर्देश देत गर्भपातानंतरची पीडितेची स्थिती जाणून घेण्यासाठी खंडपीठाने सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.