world aids day

एचआयव्ही(HIV) उपचारासाठी येणाऱ्या मुलांपैकीच हुशार, हरहुन्नरी अशा मुलांची निवड केली जाणार असून या मुलांना ‘राेल माॅडेल’ (roll model)म्हणून तयार केले जाईल. हीच मुले आपल्या साेबत असलेल्या इतर मुलांबराेबर चर्चा करुन त्यांचे मनाेधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून सकारात्मक बाब समाेर येत आहे.

नीता परब, मुंबई: जन्मजात एचआयव्हीग्रस्त(HIV) असलेल्या मुलांना किशाेरवस्थेत आल्यानंतर समजते की, आपण काेणत्या तरी आजाराने ग्रस्त आहाेत. अशावेळी आई-वडीलही मुलांना(AIDS affected children) संबंधित आजाराबाबत लपवाछपवी करतात, बऱ्याचवेळा अशा मुलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकाेनही काहीसा वेगळा असताे, ज्यामुळे मुले मानसिक आजाराची शिकार हाेतात. अशा निराशामय जीवन जगणाऱ्या मुलांसाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने एक पाऊल पुढे टाकत नवा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

एचआयव्ही उपचारासाठी येणाऱ्या या मुलांपैकीच हुशार, हरहुन्नरी अशा मुलांची निवड केली जाणार असून या मुलांना ‘राेल माॅडेल’ म्हणून तयार केले जाईल. हीच मुले आपल्या साेबत असलेल्या इतर मुलांबराेबर चर्चा करुन त्यांचे मनाेधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेकडून सकारात्मक बाब समाेर येत आहे. या आजाराने संक्रमित असलेलीच मुले इतर मुलांना खूप चांगल्या पध्दतीने समजावून सांगू शकतात व समजू शकतात असे मत मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेने व्यक्त केले आहे.

नुकत्याच झालेल्या जागतिक एडस दिवसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेने ‘‘मितवा’’ नावाने एक अभियान सुरु केले आहे. जन्मजात एचआयव्ही संक्रमित असलेल्या किशाेरवयीन मुलांसाठी हे अभियान आहे. या अभियानाकरीता एमडॅक्स सध्या युध्द पातळीवर काम करत आहे. या अभियानाच्या माध्यमातून किशाेरवयीन मुलांमध्ये आजाराबाबत असलेली भीती, एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, शिवाय भविष्यात या मुलांना शिक्षण व नाैकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जेणेकरुन, ही मुले समाजात ताठ मानेने जगू शकतील, अशी आशा एमडैक्सचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालिका डाॅ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले की, मुंबईत ९०० पेक्षाही अधिक किशाेरवयीन मुले आहेत जी मुले एचआयव्ही संक्रमित आहेत. जागतिक एड्स दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या वर्कशाॅपच्या माध्यामातून आम्हाला समजले की, अजूनही अनेक मुले उपचारासाठी घाबरतात व समाजापासून दूर राहण्याचा सातत्याने प्रयत्न करत असता. अशा मुलांना समजून घेण्यासाठी व त्यांच्या मनातील शंका दूर करण्याकरीता त्यांच्याच वयाची हुशार मुलांची निवड केली जाणार ही मुले इतर मुलांना स्वत:बराेबर सामावून घेवून त्यांच्याबराेबर सातत्याने चर्चा करत राहणार व त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करणार, या ‘‘राेल माॅडेल’’ मुलांना एमडैक्समधील प्रशिक्षणार्थींकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा मुलांसाठी एमडॅक्स महिन्यातून दाेन वेळा प्रशिक्षण वर्ग घेणार असल्याचे डाॅ. आचार्य म्हणाल्या.