गृहमंत्री १५ फेब्रुवारीला होते तरी कुठे? खाजगी विमान प्रवासाबाबत देशमुखांनी दिलं हे स्पष्टीकरण

गृहमंत्री ज्या काळात सचिन वाझेंना भेटले आणि दर महिन्याला १०० कोटींचं टार्गेट दिल्याचा आरोप केला जातो, त्या काळात प्रत्यक्षात त्यांना कोरोना झाला होता. सुरुवातीला ते रुग्णालयात दाखल होते आणि त्यानंतर त्यांच्या घरी क्वारंटाईन होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र एका वृत्तसमुहाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार अनिल देशमुख हे १५ फेब्रुवारीला चार्टर्ड विमानानं नागपूरहून मुंबईला आल्याचा दावा करण्यात येतोय. एका चार्टर विमानातून इतर ८ जणांसह देशमुख नागपूरहून मुंबईला आल्याचं सांगण्यात येतंय.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवलेल्या पत्रानंतर राज्यात आणि  देशभरात एकच खळबळ उडालीय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला होता. मात्र हा दावा तथ्यहिन असून गृहमंत्री अनिल देशमुख त्या काळात कोरोनाग्रस्त असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.

    गृहमंत्री ज्या काळात सचिन वाझेंना भेटले आणि दर महिन्याला १०० कोटींचं टार्गेट दिल्याचा आरोप केला जातो, त्या काळात प्रत्यक्षात त्यांना कोरोना झाला होता. सुरुवातीला ते रुग्णालयात दाखल होते आणि त्यानंतर त्यांच्या घरी क्वारंटाईन होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र एका वृत्तसमुहाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार अनिल देशमुख हे १५ फेब्रुवारीला चार्टर्ड विमानानं नागपूरहून मुंबईला आल्याचा दावा करण्यात येतोय. एका चार्टर विमानातून इतर ८ जणांसह देशमुख नागपूरहून मुंबईला आल्याचं सांगण्यात येतंय. तर या खासगी विमानाचं रहस्य स्वतः देशमुखांनीच उघड केलंय. 

    स्वतः अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार, ते ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत हॉस्पिटलमध्ये दाखल होते. १५ फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर अशक्तपणा असल्यामुळे खुर्चीवर बसूनच मी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर नागपूरहून खासगी विमानाने मी मुंबईला आलो आणि मुंबईत क्वारंटाईन झालो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. त्यानंतर मी २७ फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होतो आणि थेट २८ फेब्रुवारीलाच घराबाहेर पडलो, असा दावा देशमुख यांनी केलाय.