पालिकेतील सभा प्रत्यक्ष घ्या, समाजवादी पक्ष आग्रही

राज्यात कोरोनाची स्थितील लक्षात घेऊन नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिकांच्या सभा प्रत्यक्ष न घेता ऑनलाइन घेण्याच्या आदेशाची अमलबजावणी केली जात आहे. आता करोनाची तीव्रता कमी होत असल्याने लॉकडाऊन शिथील केले आहेत. तसेच, दोन मात्रा घेतलेल्यांना लोकलचा प्रवासासह विमानसेवाही सुरू झाली आहेत.

    मुंबई – मुंबई पालिकेच्या सभा, स्थायी समितीसह वैधानिक, विशेष समित्यांच्या बैठका ऑनलाइन घेण्यात येत आहेत. सध्या, कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला आहे. जनजीवन सुरळीत होत असतानाच लोकप्रतिनिधींवरील निर्बंध संपुष्टात आणावेत. त्याचप्रमाणे पालिकेतील सभा, बैठकी ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष कामकाज व्हावे, अशी मागणी आता समाजवादी पक्षाने केली आहे.

    राज्यात कोरोनाची स्थितील लक्षात घेऊन नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिकांच्या सभा प्रत्यक्ष न घेता ऑनलाइन घेण्याच्या आदेशाची अमलबजावणी केली जात आहे. आता करोनाची तीव्रता कमी होत असल्याने लॉकडाऊन शिथील केले आहेत. तसेच, दोन मात्रा घेतलेल्यांना लोकलचा प्रवासासह विमानसेवाही सुरू झाली आहेत.

    पालिकेतील सभा, समित्यांच्या बैठका ऑनलाइन घेताना लोकप्रतिनिधींना म्हणणे मांडण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे समित्यांचे कामकाज पूर्वीप्रमाणे थेट घेण्यात यावेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार-नगरसेवक रईस शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.