संजय राऊत यांच्या पत्नीच्या ईडी चौकशीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…

ईडी चौकशी सत्रावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही.” असं म्हणत अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : ईडी चौकशी सत्रावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही.” असं म्हणत अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जो कुणी भाजपाच्या नेत्याच्या किंवा धोरणाच्या विरोधात बोलेल त्याच्या मागे ईडीची चौकशी लावली जाते. तर, काहींची सीबीआय चौकशीही केली जातेय. सीबीआयबाबत तर आम्ही निर्णय घेतला आहे की, आमच्या परवानगी व्यतिरिक्त महाराष्ट्रात कुणाचीही सीबीआय चौकशी होऊ शकत नाही. मात्र ईडीचा जो अधिकार आहे त्यांचा अधिकार आहे व त्याचा राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण कधीही पाहिलं गेलं नाही.” असं अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, प्रफुल्ल पटेल, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.