गृहमंत्री अनिल देशमुख मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता ?

गृहमंत्री अनिल देशमुख यांच मंत्रीपद जाण्याची शक्यचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मध्ये कोंडी निर्माण झाली आहे. उद्या सकाळी अनिल देशमुख आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. गृहमंत्री पदासाठी राषट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या प्रकरणावर काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

    मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात  NIA ने अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

    दरम्यान मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. या प्रकरणावरुन विरोधी पक्षांने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.

    या प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच मंत्रीपद जाण्याची शक्यचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मध्ये कोंडी निर्माण झाली आहे. उद्या सकाळी अनिल देशमुख हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. गृहमंत्री पदासाठी राषट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत.