ramdas aathawale

मुंबई : हटके स्टाईल, रंगीबेरंगी कपडे आणि शीघ्र कविता यामुळे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. रामदास आठवले यांचा आज वाढदिवस. गृहमंत्र्यांकडून रामदास आठवलेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

आठवले यांनी ६२व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना त्यांच्याच स्टाईलमध्ये म्हणजेच कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

“बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी | बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी ||
पण आज दिवस आहे जल्लोषाचा | कारण वाढदिवस आहे भारी कवीचा ||
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग | आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग ||
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.