Home Minister Anil Deshmukh's complaint; Sharad Pawar is upset over Parab's increasing interference

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे महाविकासआघाडीच्या गोटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारात शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच ही गोष्ट शरद पवार यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा मुद्दा मांडल्याचे समजते.

    आता अंबानी स्फोटक प्रकरणातील सचिन वाझेंच्या कथित सहभागानंतर अनिल देशमुख यांच्याकडून पुन्हा एकदा अनिल परब यांच्या गृहखात्यातील हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

    काही महिन्यांपूर्वी मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढलेल्या आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे महाविकासआघाडीच्या गोटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती.

    अखेर शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढली होती. या काळात गृह खात्यातील अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या अनेक बैठक अनिल परब यांच्या बंगल्यावर पार पडल्याचे समजते.