कंगनाच्या विरोधात शीख समुदायाने घेतली गृहमंत्र्यांची भेट

अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शीख समुदायाने केली आहे. यासंदर्भात दिल्लीच्या शीख समुदायातील प्रतिनिधींनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

  मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेत तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शीख समुदायाने केली आहे. यासंदर्भात दिल्लीच्या शीख समुदायातील प्रतिनिधींनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. अभिनेत्री कंगना राणावत हिने ट्विट च्या द्वारे शीख समुदायाचा विरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. तसेच देशाच्या प्रतीही अनादर व्यक्त केला आहे. त्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी शीख समुदायाने केली आहे.

  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची घेतली भेट

  कंगना राणावत हिच्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेत कारवाई करावी, या मागणीसाठी दिल्ली शीख समूह व्यवस्थापन समितीच्यावतीने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आज मंत्रालयात भेट घेण्यात आली. एकापाठोपाठ एक आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कंगना वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.कंगणा राणावत या वादग्रस्त विधानाची फॅक्टरी बनली आहे.
  शिख समुदाय आणि माजी पंतप्रधान यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे. त्यामुळे समाजात याची प्रतिक्रिया उमटू नये यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी अशी गृहमंत्री यांच्याकडे मागणी शिख समुदायाचे प्रमुख मनजितसिंग सारसा यांनी मागणी केली आहे.

  राष्ट्रपतीनाही दिले निवेदन

  दरम्यान, कंगना राणावत हिच्यावर कारवाई करुन तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी विनंती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहितीही सारसा यांनी यावेळी दिली.