‘गृहमंत्र्यांनी दिलं होत महिन्याला १०० कोटी वसुलीचं टार्गेट’, पोलीस अधिकारी परमबीर सिंग याचा खळबळजनक आरोप

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्या पत्रात केला आहे.

    मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू व सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्या पत्रात केला आहे.

    परमबीर सिंह यांची पोलिस आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. आठ पानांच्या या पात्रात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वाझेंचार निलंबन रद्द करून काय पोलीस दलात परत घेतल्यानंतर वाझेना नेमके काय टार्गेट देण्यात आले सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

    पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या प्रकरणात परमबीर सिंह यांना अटक करावी, त्यांची चौकशी करावी.

    या मागणीबरोबरच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. परमबीर सिंह यांच्या पत्राने गृहमंत्र्यांसमोरची आव्हाने वाढली आहेत. या प्रकरणात एनआयएची चौकशी सुरु झाल्यानंतर आणि वाझेंना याप्रकरणी अटक झाल्यानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. मात्र त्यावेळी राष्टवादीने त्यांची पाठराखण केली होती. मात्र आता खुलेपणाने असे आरोप झाल्याने आणि पुरावे दिल्याने देशमुख अडचणीत आले आहेत.

    देशमुख यांनी हे आरोप फेटाळले असले, तरी आता या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीला घ्यावी लागणार आहे. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचे गंभीर पडसाद सध्या उमटत आहेत. या प्रकरणात मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू , सचिन वाझेंचे नाव, त्यांना झालेली अटक, मुंबई पोलिसात झालेल्या बदल्या, यात आता या लेटरबॉम्बची भर पडली आहे.