‘बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?’ चंद्रकांत पाटील यांचा सवाल

"हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली. आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा!” असं चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्वीटमधे म्हटलं आहे.

    शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या शंभर कोटींच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी वाशीमला गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर कोही लोकांनी दगडफेक व शाई फेकल्या. वाशिममधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ हा प्रकार घडला. त्यामुळे सध्या भाजपकडून शिवसेनेवर सडकून टीका होत आहे. या प्रकारामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील “वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?” असा सवाल विचारत टीका केली आहे.

    गाडीवर झालेल्या हल्ल्याचे फोटो किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले. या ट्वीटला रिट्वीट चंद्रकांत पाटील यांनी “वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली. आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा!” असं म्हटलं आहे.

    सोबतच “जनतेची फसवणूक करून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर केलेले घोटाळे आणि कारनामे लपवण्याच्या उद्देशाने, महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सतत आवाज उठवणारे भाजपाचे ज्येष्ठ आणि संघर्षशाली नेते मा. श्री. किरीट सोमैय्या जी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध !” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्वीटमधे म्हटलं आहे.

    दरम्यान, एकेकाळी मांडीलामांडी लावून सत्तेत बसलेले शिवसेना व भाजप या दोनही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात भाजप सोबत सत्तेत असलेली शिवसेना महाराष्ट्रात सध्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे. त्यामुळे काही वर्षापुर्वी सख्खे मित्र असलेले हे पक्ष आता मात्र पक्के वैरी झाले आहेत.