‘बाळासाहेबांबत राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची राज ठाकरेंवर टीका

नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाव देण्याचा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं. यामुळे खेदजनक आणि वाईट वाटतं, असं म्हणत शिवसेना आणि प्रवक्ते अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

    मुंबई : नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं ठरवलं आहे. तर स्थानिक नागरिकांकडून विमानतळाला दी .बा. पाटील असं नाव देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.

    दरम्यान यावर बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. यावरून त्यांच्यावर शिवसेनेने निशाणा साधला आहे. नवी मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाव देण्याचा जीआर निघाला आहे. बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं. यामुळे खेदजनक आणि वाईट वाटतं, असं म्हणत शिवसेना आणि प्रवक्ते अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

    ज्येष्ठे नेते दि. बा पाटील यांनी चांगलं काम केलं यात वाद नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण राज्यानं पाहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर राजकारण करू नये. या विमानतळाच्या नामकरणावर राजकारण बाजूला ठेवा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. बाळासाहेब हयात असते तर असा प्रश्नच उद्भवला नसता, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हा ते सांताक्रूझमध्ये आलं नंतर ते सहारापर्यंत गेलं. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव द्यावं असं मला वाटत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.